एक वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात, विविध विभागांना भेट आणि पाहणी

CM उद्धव ठाकरे हे एक वर्षानंतर मंत्रालयात आले. त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी चर्चा देखील केली.

Updated: Apr 13, 2022, 05:10 PM IST
एक वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात, विविध विभागांना भेट आणि पाहणी title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात विविध विभागांना भेट दिली. एक वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात आले होते. वित्त, महसूल, गृह आणि वन विभागात पाहणी केली. गृह विभागाचा आढावा घेताना कागदपत्रे डिजिटल करण्याची सूचना केली. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक प्रदर्शन भरवण्यात आलंय. त्याची पाहणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खर्गे, पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते.  

मी आज 1 वर्षानंतर मंत्रालयात आलोय. त्यामुळे आढावा घेतोय. आढावा घेताना मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी हसत प्रश्न विचारला तुमचे मंत्री मंत्रालयात येतात का?

मुख्यमंत्री यांनी आज वित्त, महसूल, गृह आणि वन विभागात पाहणी केली. गतिमान कारभारासह अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूनचा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली आणि त्याची विचारपूसही केली. प्रशासकीय कामकाजासाठी एक वर्षांनंतर मुख्यमंत्री मंत्रालयात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात प्रवेश केला.