मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

  राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 2, 2021, 02:07 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित  title=

 मुंबई :  राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी रात्री 8:30  वाजता संवाद साधणार आहेत.
 
 मुख्यमंत्री आज रात्री 8:30 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून बोलणार आहे.
 सायंकाळी 4:30 वाजता मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकांनंतर मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.
 
मुख्यमंत्र्यांकडून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंधांची  घोषणा लागू होण्याची शक्यता आहे.