मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पोलिसांच्या घरांचा (Police Houses) मार्ग मार्गी लागण्यासाठी घर बांधणीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कामाला लागा, घरे बांधा, असे आदेश दिले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांत चांगल्या सुविधा देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या घरांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली होती. यात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंहामंडळाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत बोलताना गृह मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी घरे दिली, त्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी घरे उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घरे बांधण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP, नगर विकास मंत्री @mieknathshinde उपस्थित. पोलिसांसाठी जास्तीत जास्त संख्येने निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. pic.twitter.com/E2MpqbzDOy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2020
पोलिसांसाठी नोकरीच्या ठिकाणी चांगली घरे मिळाल्यास पोलिसांची कार्यक्षमता वाढेल. त्यासाठी चांगल्या सुविधांनी युक्त अशी जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात पोलिसांना चांगली सुविधायुक्त घरे मिळण्याची शक्यता आहे.