सिडकोच्या घरांच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडला. यंदाच्या दसऱ्याला सिडकोची लॉटरी सुरु होणार होती. पण त्याचा मुहूर्त आता बदलला आहे. दसऱ्याच्या अगोदचा हा मुहूर्त काढण्यात आला आहे. मुंबईत घर घेण्याच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
सिडको बोर्ड मिटींगमध्ये नवी मुंबईतील घरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. सिडकोच्या घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे 26 हजार घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.
यासोबतच महामंडळाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेता आहे. हा निर्णय सिडको घरे (CIDCO House) खरेदी, विक्री आणि लॉटरी (CIDCO Lottery) याबाबत आहे. महामंडळाने नुकताच याबाबत एक महत्त्वपूर्णन निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आता महामंडळ निर्मीत घरांच्या विक्रीसाठी महामंडळाच्या एनओसीची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीस घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा मोठा निर्णय महामंडळाद्वारे (CIDCO Corporation) घेण्यात आला आहे.
सिडको महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लीजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घरे विकण्यासाठी सीडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत असे. याशिवाय ही घरे विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत असे. नव्या निर्णयाने हा नियम रद्द करण्यात आल्याने असंख्य सीडको गृहधारकांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय घरेही विनात्रास विकता येणार आहेत.
सिडकोच्या घरांची लॉटरी ही 7 ऑक्टोबर म्हणजे पुढच्या सोमवारी निघणार आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये ही लॉटरी निघणार आहे. अनेक दिवसांपासून सिडकोच्या घरांच्या लॉटरीच्या तारखेकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं.