विक्रोळीच्या रस्त्यावर रिक्षाचा अपघात, मुख्यमंत्री ताफा थांबवून धावले मदतीला; VIDEO चर्चेत

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री सारे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवून त्याच्या मदतीला जातात, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 10, 2024, 01:12 PM IST
विक्रोळीच्या रस्त्यावर रिक्षाचा अपघात, मुख्यमंत्री ताफा थांबवून धावले मदतीला; VIDEO चर्चेत  title=
Eknath Shinde Help Vikroli Accident

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरुन काम करण्यासाठी ओळखले जातात. प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत ताफा असतो. काही प्रोटोकॉल्स असतात. पण कोणी अपघातग्रस्त किंवा गरजू दिसला तर मुख्यमंत्री सारे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवून त्याच्या मदतीला जातात, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्सनल अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यामध्ये मुख्यमंत्री अपघातग्रस्तांना मदत करताना दिसतायत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. विक्रोळी येथील रस्त्यांवर एका रिक्षाला अपघात झाला होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून चालला होता. ते अपघातग्रस्त मदतीची वाट पाहत होते. पण त्यांच्याजवळ मदतीची साधने नव्हती. दरम्यान मुख्यमंत्री ठाण्यातून विधानभवनाच्या दिशेने जात असताना त्यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी ताफा थांबवला. आणि थेट अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. 

पाहा व्हिडीओ

काय घडली घटना?

ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालो असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावेळी मी माझा ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच माझ्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस तर केलीच. पण त्यांना आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका दिली. यातून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. मुख्यमंत्री स्वत: अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेपर्यंत सोडताना दिसत आहेत. त्यांची काळजी घेण्याचे आवाहन सहकाऱ्यांना करत आहेत.