महामंडळाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

नाराज शिवसेनेला चुचकारण्याच्या निमिताने कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अखेर महामंडळच्या नियुक्त्यांना  हिरवा कंदील दिलाय. 

Updated: Apr 20, 2018, 11:44 AM IST
महामंडळाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील title=

मुंबई : नाराज शिवसेनेला चुचकारण्याच्या निमिताने कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अखेर महामंडळच्या नियुक्त्यांना  हिरवा कंदील दिलाय. पुढील काही दिवसांत महामंडळ वाटप जाहीर करण्यात येईल असं भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. मलिदा असणारी दोन प्रमुख महामंडळ कोणाच्या वाट्याला येणार हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. विविध वादामुळे नेहमी चर्चेत असणारे म्हाडा शिवसेनेला देण्यात येणार आहे. असं असलं तरी यामधील मुंबई, कोकण, पुणे अशी काही महत्त्वाची मंडळे कोणाच्या ताब्यात राहाणार हे अजून समजू शकलेले नाही. 

आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आणि ताकदीचे, नवी मुंबई विमानतळमुळे सध्या चर्चेत असलेले सिडको हे भाजपाने स्वतःच्या ताब्यात ठरवण्यात यश मिळवलं आहे. 

पहिल्या टप्प्यात किमान 10 महामंडळच्या वाटपांची आणि प्रमुखांची घोषणा करण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.  तर त्याचबरोबर काही दिवसांतच महामंडळमधील सदस्यांची नियुक्तीही जाहीर करण्यात येणार आहे.  यामुळे भाजप - सेनेच्या पदाधिकारी आणि  कार्यकर्त्याच्या काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.