मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनाचा नवा व्हायरस हा अधिक घातक असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. म्युकरमायकोसिसबाबत ही त्यांनी चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की...
'कोरोनामुळे अनेक आपली माणसं सोडून गेली. अनेक बालकं अनाथ झाले आहेत. अनाथ बालकांचं पालकत्व सरकार घेईल. यासाठी सरकार लवकरच योजना बनवणार असून ती जाहीर करु. केंद्र सरकारने योजना आणली असली तर राज्य सरकार देखील अशा बालकांच्या पाठिशी आहे.'
कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. कोरोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही. रस्त्यावर उतरायचं असेल तर कोरोना योद्धा म्हणून उतरा असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
'रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होण्यासारखे आहे. आपण त्याचे निमंत्रक होऊ नका. हळूवारपणे एक-एक गोष्टी सुरु कराव्या लागतील. कोरोनामुक्त गाव ही संकल्पना आपण यशस्वी केली तर तिसरी लाट येणारच नाही. काय करावे आणि काय नाही करावे. हे आपल्या सर्वांना आता माहित झालं नाही.'
'कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्यास वेळ लागत आहे. ऑक्सीजनची आवश्यकता वाढली. काही जिल्ह्यात अजून रुग्णांची संख्या वाढत आहेत.'
'ग्रामीण भागात कोरोनाचं प्रमाण वाढतं आहे. तिसरी लाट तारीख सांगून येणार आहे. कोरोनाचा नवा व्हायरस झपाट्याने वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे.'
तिसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले तर ऑक्सीजनच्या उपलब्धतेबाबत ही मुख्यंमत्र्यांनी चिंता व्यक्त केली.
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत ही चिंता व्यक्त केली. 'माझा डॉक्टर ही संकल्पना ही यशस्वी होतेय. कारण आपल्या डॉक्टरला आपली योग्य माहिती असते. टास्क फोर्समध्ये देखील म्युकरमायकोसिसचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत.'
'पावसाळा तोंडावर असल्याने आणि कोरोनाचं संकट अजूनही डोक्यावर असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. कारण सर्दी, खोकला, ताप सारखे पावळ्यात उद्धभवतात. त्यामुळे कोरोना झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. क्वारंटाईन राहा. रुग्णालयात दाखल व्हा.'
'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. पण मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना अधिक त्रास होणार नाही. अशी आशा आहे.'
चक्रीवादळात प्रशासनाने चांगलं काम केल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 18 ते 44 वयातील व्यक्तींचं लसीकरण लवकरच पुन्हा सुरळीत होईल.