Mumbai Coastal Road Name: मुंबईमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव दिलं जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी गेट वे ऑफ इंडिया येते आयोजित कलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल हायवेच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पुतळाही उभारला जाणार असल्याची घोषणा केली.
"छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य व बलिदान नव्या पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ असलेल्या वढू बुद्रुक आणि तुळजापूरमध्ये विकास आराखड्याच्या माध्यमातून कामं सुरु आहेत. कोस्टल रोड भागामध्येही छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभारला जाणार आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा करताना म्हटलं.
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. याच कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल.
गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच आयोजित… pic.twitter.com/eLRcQkzBqk— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 14, 2023
रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात भाषणा देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, "पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण हे स्पूर्ती देणारे आणि प्रेरणादायी आहे. शिवशंभुरायांचे कार्य व योगदानाचे जतन करणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती मोहोत्सव देशभरात पोहचवला जाईल," असा शब्द दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात साजरा करण्याची तयारी राज्य सरकार करत असल्याचंही शिंदेंनी यावेळेस सांगितलं.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती यंदा पहिल्यांदाच मुंबईतल्या 'गेटवे ॲाफ इंडिया' येथे साजरी होतेय याचा आनंद आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव… pic.twitter.com/f6RfGu1CRv
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 14, 2023
याच कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राजमाता जिजाऊंचे वंशज विजयराव जाधव, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, यामिनी जाधव हे उपस्थित होते.