फोटो आमचा, फोटोग्राफर आमचा... आशिष शेलारांना काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर

आज शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली.

Updated: Nov 28, 2019, 09:22 PM IST
फोटो आमचा, फोटोग्राफर आमचा... आशिष शेलारांना काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर  title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची ओळख परेड झाली होती. यावेळी आपले संख्याबळ दाखवण्यासाठी महाविकासआघाडीने सर्व आमदारांचे एकत्रित फोटोसेशनही करवून घेतले होते. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीची खिल्ली उडविली होती. फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला होता. मात्र, संख्याबळाअभावी भाजपला सत्तास्थापनेच्या या लढाईतून माघार घ्यावी लागली होती. 

दोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी

यानंतर आज शिवतीर्थावर महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी पार पडला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शेलार यांनी केलेल्या टीकेची परतफेड केली आहे. त्यांनी ट्विट करून शेलार यांना त्यांच्यात शैलीत टोला हाणला आहे. फोटो आमचा, फोटोग्राफर आमचा, फोटोफ्रेममध्ये आम्हीच आणि फोटोफिनिश नव्हे तर क्लीनफिनिशही आमचाच, असे सावंत यांनी म्हटले आहे. 

अखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार... उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

तत्पूर्वी आज शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.