मुंबईत फ्लायओव्हरचा गर्डर कोसळला

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर एका फ्लायओव्हरचे काम सुरू असताना गर्डर कोसळून अपघात 

Updated: Oct 20, 2018, 11:26 PM IST
मुंबईत फ्लायओव्हरचा गर्डर कोसळला  title=

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर एका फ्लायओव्हरचे काम सुरू असताना गर्डर कोसळून अपघात झाला. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर लोटस जंक्शनजवळ हा अपघात घडला. मुख्य पिलरपासून हा गर्डर वेगळा होऊन कोसळला. दरम्यान, या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. हा अपघात हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने फ्लायओव्हरच्या गर्डरला धडक दिली आणि हा अपघात झाला. गर्डर कोसळल्याने फ्लायओव्हरखाली पार्क केलेल्या दोन गाड्यांचे नुकसान झाले. या अपघातात मुंबई पोलिसांची मार्शल बाइक आणि एका मारुती सेलेरिओ गाडीचं नुकसान झाले आहे.