मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

पालिका आयुक्तांनी दिले प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

Updated: Dec 27, 2021, 08:05 PM IST
मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये title=

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना बाधितांच्या (corona cases in mumbai) संख्येत वाढ होत आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना रुग्ण संख्याचे प्रमाण कमी जास्त होत आहेच. त्यामुळे पालिका अधिकारी चिंतातूर झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका (bmc) आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी आज एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आयुक्तांनी कोविड प्रतिबंधात्मक (covid-19) उपाययोजनांची अंमलबजावणी ही कठोरपणे व काटेकोरपणे करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिका आयुक्तांनी दिले आदेश
- कोविड उपचार केंद्रांसाठी ज्या जागा तसेच रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत त्याची माहिती अद्ययावत करणे.

- पालिका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठाबाबत तातडीने खातरजमा करून घेणे. त्यानुसार साठा उपलब्धतेबाबत कार्यवाही करणे

- त्रिसूत्रबाबींचे पालन सर्वत्र योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा करणे. नियमितपणे जनजागृती करणे

- 'मास्क' न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करणे

- 'ओमायक्रॉन'च्या संभाव्य प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश.

- सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा रुग्णखाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार बाबी याचा पुरेसा साठा तयार ठेवणे.

- मनपाच्या सर्व २४ विभागातील 'विभागीय नियंत्रण कक्ष' यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेणे.

- २४ विभागांमध्ये विभागीय स्तरावर सर्वंकष आढावा घेऊन सूक्ष्म स्तरीय नियोजन करणे.

- ऑक्सिजन केंद्रे सुरु करण्यात आलेल्या रुग्णालय व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचत असल्याची खातरजमा करणे

- 'ओमायक्रॉन' या विषाणूच्या प्रसाराची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश.