चिंता वाढली : मुंबईत कोरोनाचे ५ नवे तर राज्यात १५३ रुग्ण

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १५३ वर पोहोचली आहे. 

Updated: Mar 27, 2020, 07:08 PM IST
चिंता वाढली : मुंबईत कोरोनाचे ५ नवे तर राज्यात १५३ रुग्ण
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १५३ वर पोहोचली आहे. मुंबई नव्याने पाच रुग्ण आढळलेत. तर सांगलीत १२ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या ही १२५ होती. आज सांगलीत सकाळपासून १२ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. तर नागपूरमध्ये आज नवीन ५ रूग्ण आढळले,यात २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तर मुंबईत पाच नवे रुग्ण वाढलेत. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १५३ वर गेली आहे. 

आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

चिंता वाढवणारी बातमी असताना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबई वरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.! या वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप दिला.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आलाय. गोंदियातील २३ वर्षींच्या तरुणाला कोरनाची लागण झाली आहे. हा रुग्ण नातेवाईक आणि छत्तीसगड राज्यातील त्याच्या मित्रांसोबत थायलंडला फिरायला गेला होता.१७ मार्चला तो गोंदियात परतला. मात्र त्याला कोरोनाची कोणतिही लक्षणं आढळून आली नाहीत.