मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रांनी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या कारखान्यातील कामगारांना ऑफिसमध्येच जेवणाची तयारी केली आहे. अशावेळी प्लेट्स न देता केळीच्या पानावर जेवण वाढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या निर्णयाचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे.
आनंद महिंद्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना निवृत्त पत्रकार पद्म रामनाथ यांना एकदा अचानक मेल आला. केळी उत्पादक शेतकऱ्यांच लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जेवणाकरता प्लेट ऐवजी केळीचे पान वापरू शकता, अशी कल्पना सुचवली आहे. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांची गैरसोय झाली आहे.
A retired journalist, Padma Ramnath mailed me out of the blue & suggested that if our canteens used banana leaves as plates, it would help struggling banana farmers who were having trouble selling their produce. Our proactive factory teams acted instantly on the idea...Thank you! pic.twitter.com/ouUx7xfMdK
— anand mahindra (@anandmahindra) April 9, 2020
ही कल्पना मला अतिशय आवडल्यामुळे मी तात्काळ अंमलबजावणी केली. कँटिनमधून प्लेट हद्दपार करून केळीच्या पानांचा वापर केला आहे. सोशल मीडियावर याचं भरभरून कौतुक होत आहे. आतापर्यंत हे ट्विट १३ हजारून अधिक लोकांनी लाई केली असून या ट्विटमध्ये महिंद्रांनी केळीच्या पानावर जेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर केले आहे.
अशापद्धतीचे छोट्या उत्पादकांचा व्यावसायिक पाहिला नाही अशा शब्दात आनंद महिंद्रांच कौतुक होत आहे.