Coronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती

Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे.  

Updated: Jan 5, 2022, 01:24 PM IST
Coronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे. चांगली बाजू म्हणजे संख्या वाढतेय, पण 90 टक्के लोक लक्षणविरहित आहेत, त्यातही एक टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. लसीकरण झालेले बाधित होतात, पण त्यांची तीव्रता जास्त नाही. खासगी रुग्णालयात बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक झाली. ज्यात टास्क फोर्स, नियोजन विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता काय करता येईल, यावर चर्चा झाली आहे. यात बुस्टर डोसवर चर्चा झाली. त्यानुसार खासगी रुग्णालयांना याबाबतची परवानगी देेण्यात आली आहे. राज्यात आज कोरोनाच्या 25 हजार रुग्णांचा आकडा असेल, असेल अशी माहिती देण्यात आली आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही. लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती 50 ते 75 टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता आहे. शक्य असेल त्या खाजगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता आहे.

दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता असून राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध आणले जातील. आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाणार आहे.

मॉल आणि रेस्टॉरंटमधील निर्बध आणखी कडक होणार आहेत. तर राज्य बंदी करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक व्याबस्थेत प्रवासावर निर्बध असतील असे संकेत मिळत आहे. मुंबईच्या लोकलमधील होत असलेली गर्दी पाहता निर्बध लागण्याची शक्यता आहे. जे निर्बध लावले आहेत त्यावर कठोर कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.