Good News : कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, तरीही घराबाहेर पडू नका - आरोग्यमंत्री

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Mar 24, 2020, 04:40 PM IST
Good News : कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, तरीही घराबाहेर पडू नका - आरोग्यमंत्री title=

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा फैलावर जास्त होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सिमाही बंद करण्यात आल्या आहेत. घरातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन वेळोवेळी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. अशावेळी एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, अशी महत्त्वाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब आहे. सध्या दोनच कोरोनाबाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत.

राज्यातील कोरोनाबिधातांची संख्या १०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य मंत्र्यांनी समाजमाध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. 'मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार' असा पण आपण सगळ्यांनी करुया, असे आवाहन टोपे यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले. उद्या गुढीपाडवा सण आहे. या निमित्ताने आपण कोरोनावर मात करण्याचा संकल्प करुया. या विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवण्याचा निर्धार करुया, असे टोपे म्हणालेत.

मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. या दोन्ही शहरांतील नागरिकांकडे ग्रामीण भागातील लोक संशयाने पाहत आहेत. हे योग्य नाही. मुंबई, पुण्यातून मूळगावी जर कोणी येत असेल तर अशा व्यक्तींना गावात येण्यापासून अडवू नका. ही आपलीच माणसे आहेत. तेव्हा त्यांच्याशी माणुसकीने वागा. त्यांना गावबंदी करण्यासारखी असंस्कृत पावले टाकू नका, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.