मेघा कुचीक, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांची जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात सुनावणी झाली. नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावला आहे. नवाब मलिक यांना जामीन का मिळत नाही या संदर्भातील 43 पानांचा आदेशच कोर्टाने सार्वजनिक केला आहे.
मुंबई विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला, याबाबतचा सविस्तर 43 पानांचा आदेश सार्वजनिक करण्यात असून नक्की जामीन का फेटाळण्यात आला त्याची ही कारणे...
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी (Money Laundering Case) अटक करण्यात आली आहे. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाडसत्र राबवले होते.