क्रिकेट म्युझियम : आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी भेट घेतली. 

Updated: Feb 25, 2020, 11:41 PM IST
क्रिकेट म्युझियम : आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट

मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी भेट घेतली. मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट म्युझियम उभे करायचे आहे. त्यासाठी पवारांची मदत लागणार आहे. त्यामुळे त्यांची भेट घेतल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. 

आदित्य ठाकरे म्हणालेत, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी पर्यटन, उद्योग, पर्यावरण आणि महाराष्ट्रात येणाऱ्या अनेक प्रकल्पांबाबत चर्चा झाली. तसेच मरिन ड्राईव्हचा विकास, हेरिटेज आणि उद्योग विभागाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

अनेक प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. त्यांना कसं सामावून घ्यायचं याबाबतही चर्चा करण्यात आल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.