'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले

समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीची चौकशी करा

Updated: Feb 25, 2020, 10:27 PM IST
'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले title=

मुंबई : समृद्धी महामार्ग जमिनी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्तवीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. समृद्ध महामार्गाची अधिसूचना जारी होण्याआधी या मार्गालगत राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जमीनी खरेदी केल्या. अधिसूचनेनंतर जमीनींच्या किंमती वाढल्या. या जमीनींचा पाच पट मोबदला या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. 

पृथ्वीराज चव्हाण यांचे हे आरोप राज्य रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले. या प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांमार्फत झाली असून त्यात काहीही तथ्य आढळलं नसल्याची माहिती राज्य रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तरीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.