हार्दिकच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन, शेअर केला फोटो

हार्दिक पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन...

Updated: Jul 30, 2020, 05:15 PM IST
हार्दिकच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन, शेअर केला फोटो  title=
फोटो सौजन्य : Instagram

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. हार्दिक पांड्या बाबा बनला आहे. हार्दिकची पत्नी नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वत: सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We are blessed with our baby boy

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक आणि नताशा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. दोघंही एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नताशाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हार्दिक आणि नताशा, आई-बाबा झाल्यानंतर त्यांच्या या आनंदात अनेक जणांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही हार्दिक-नताशाचं, आयुष्याच्या या नव्या, सुंदर टप्प्यांवर स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @begborrowstealstudio

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी, सर्बियाची नागरिक आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचशी दुबईमध्ये साखरपुडा केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on