१० हजाराचा हफ्ता दिला नाही म्हणून डोक्यात फरशी घातली; कोर्टाने आरोपीलाही दिला जबर दणका

कुर्ला येथील ३८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्ष तुरूंगवास आणि १० लाखाचा दंड ठोठावला आहे.

Updated: Jun 30, 2021, 02:36 PM IST
१० हजाराचा हफ्ता दिला नाही म्हणून डोक्यात फरशी घातली; कोर्टाने आरोपीलाही दिला जबर दणका title=

मुंबई : कुर्ला येथील ३८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्ष तुरूंगवास आणि १० लाखाचा दंड ठोठावला आहे. त्याने केलेले कृत्यदेखील तसेच हिंस्र होते. आरोपीने १० हजार रुपये महिना हफ्ता न दिल्याच्या रागातून एका जोडे विक्रेत्याच्या डोक्यात शाहबादी फरशी मारली होती. ही घटना 2014 सालची असून न्यायालायाने आज आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

गोवंडी येथील मोहम्मद शाह यांच्यावर आरोपीने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना एक कान गमवावा लागला आहे. दिनेश कोथलीकर यांच्या विशेष न्यायपीठाने आरोपी विक्रमसिंग राजपूतला खुन करण्याच्या प्रयत्नाचा गुन्ह्याची शिक्षा सुनावली आहे. 

आरोपी विक्रम राजपूतला २०१७ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा सहकारी काल्या पप्पुलाहदेखील पोलिसांनी अटक केली होती. 

आरोपीने सज्ञानातून पीडितेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करीत त्याला १० वर्षे तुरूंगवास आणि १० लाख रुपयांची दंड ठोठावला आहे.