पिकविमा कंपन्यांनी पिकांचं नुकसान गंभीरतेने घेण्याची गरज- शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे.

Updated: Nov 6, 2019, 03:29 PM IST
पिकविमा कंपन्यांनी पिकांचं नुकसान गंभीरतेने घेण्याची गरज- शरद पवार title=

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे. पण तरी देखील पिकविमा कंपन्या याबाबतीत गंभीर नसल्याचं दिसून येत नाही. यामुळे सरकारने पिकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि ठरल्याप्रमाणे योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देणे गरजेचे असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पिकविमा कंपन्या आणि सरकारच्या नावाने बोंबाबोंब

राज्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. पण नुकसान होवूनही अनेक शेतकऱ्यांना ही भरपाई मिळत नाही. पिकविमा कंपन्या आपल्या सोयीप्रमाणे नियम बदलत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

खरंतर पिकविमा कंपनी म्हणजेच सरकार असा समज शेतकऱ्यांचा आहे. कदाचित पिककर्ज घेताना पिकविमा घेणे शेतकऱ्यांना अनिवार्य केला आहे, त्यामुळे तसेच पिकविम्याची बाकीची रक्कम ही सरकारकडून भरली जाते, त्यामुळे असं वाटणं स्वाभाविक असलं. 

तरी सरकारने पिकविमा कंपन्यांना जाचक अटी शिथिल करून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्याला जमा करणे आवश्यक आहे.