Zee 24 Taas Investigation : आंबेडकरी पुस्तकांच्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा

कंत्राटदाराला हाताशी धरून उच्चपदस्थ बाबूंनी तब्बल एक टक्के वाढीव दर लावून पुस्तक खरेदी केल्याचं उघड झालंय.    

Updated: Dec 5, 2022, 07:01 PM IST
Zee 24 Taas Investigation : आंबेडकरी पुस्तकांच्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा title=

गोविंद तुपे, झी मीडिया, मुंबई  :  राज्यातल्या गावागावांमध्ये समाज प्रबोधन व्हावं यासाठी आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) आणि फुलेंच्या (Mahatma Phule) विचारांची पुस्तकं (Books) पोहचवण्यासाठी सामाजिक न्याय खात्यानं (Social Justice Department Maharashtra) अभिनव योजना राबवली. मात्र या पुस्तक खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. कंत्राटदाराला हाताशी धरून उच्चपदस्थ बाबूंनी तब्बल एक टक्के वाढीव दर लावून पुस्तक खरेदी केल्याचं उघड झालंय. पाहूयात यावरचा (Zee 24 Taas Investigation Report) झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनचा रिपोर्ट. (crore rupees scam in book purchase of social justice department see zee 24 taas investigation report)

राज्यातल्या विविध खात्यांमधल्या बाबूंचा भ्रष्टाचारा थांबायला तयार नाही.  झी २४ तासनं महिला बाल कल्याण, शालेय शिक्षण, अन्न व नागरीपुरवठा खात्यातले कोट्वधींचे घोटाळे बाहेर काढले. त्यानंतर आता सामाजिक न्याय विभागातला कोट्यवधींचा पुस्तक खरेदीतला भ्रष्टाचार बाहेर काढलाय. समाजप्रबोधनासाठी फुले-आंबेडकरांचे विचार गावागावांमध्ये पोहचावेत यासाठी 2018-19 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागानं समाज मदिरांमध्ये पुस्तकांचं वाटप सुरू केलं आणि सुरू झाली बाबूंची कंत्राटदारांना हाताशी धरून कोट्यवधींची खाबूगिरी. 

पुस्तक खरेदीची निविदा 27 एप्रिल 2022 ला काढण्यात आली. 5 जुलै 2022 ला याचं कंत्राट देण्यात आलं. या कंत्राटाच्या संपूर्ण प्रक्रियेची कागदपत्रं झी तासच्या हाती लागले आहेत. महापुरूषांचे विचार पोहचवण्याच्या नावाखाली कसा कोट्यवधींचा मलिदा लाटला जातो हे पाहून तुमचाही संताप झाल्याशिवाय राहणार नाही.

पुस्तक लेखक पब्लिकेशन मूळ किंमत  शासनाने खरेदी केलेली किंमत
भारताचे संविधान  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर      -------- 300 रूपये 1000 रूपये
उवाच डॉ. विश्वास येवले  सायन पब्लिकेशन 200 रूपये 897 रूपये
पॉईंट ब्लँक काशिनाथ मिसाळ सायन पब्लिकेशन 369 रूपये  1404 रूपये
एन्जॉय द लाईफ मनोहर घंडवाले  सायन पब्लिकेशन  210 रूपये 811 रूपये
महात्मा फुले  अजित पाटील जुलूस प्रकाशन 100 रूपये 1100 रूपये
सरणावरला शंकऱ्या  अजित पाटील  सायन पब्लिकेशन 190 रूपये 690 रूपये

अशा 210 पुस्तकांचे 100 संच प्रत्येक जिल्ह्याला वाटण्यात आले. म्हणजे या पुस्तकांची थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल 36 कोटी रुपयांना खरेदी केल्याचं दाखवण्यात आल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झालंय. सामाजिक न्याय खात्यातल्या बाबूंनी अहमदनगरच्या शब्दालय पब्लिकेशन हाऊस या कंपनीला हे कंत्राट दिलं आणि कोट्यवधींचा मलिदा लाटला. त्यामुळे या याजनेतून समाजाचा विकास होतोय की बाबू आणि कंत्राटदारांचा  याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.