मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सध्या भलत्याच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला. त्यामुळे नेटीझन्सनी त्यांच्यावर प्रतिक्रीयांचा पाऊस पाडला. परिणामी त्या सोशल मीडियात ट्रोल झाल्या.
I hope madam@amruta_fadnavis n hubby Dave can appeal to their coreligionists to not wear Santa suits this Xmas as they cause pollution in production. Just like they appealed against crackers on Diwali. Oh and no crackers on new year please.
— rajeev bhardwaj (@rajeev579) December 12, 2017
Mrs. Amruta Fadnavis OR FERNANDES ?? Please leave some space for Hindus too. Take it from a Voter of Maharashtra, this Secular Sycophancy won't do any good to your husband's vote bank politics. Before next Maharashtra elections he will be KICKED OUT by Modi for this. https://t.co/Pj10wX0qEK
— Uch2828 (@Uch28281) December 13, 2017
अमृता फडणवीस या एका एफएम रेडिओ चॅनलवर एका चॅरिटेबल इव्हेंटमध्ये मंगळवारी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाची थीम ख्रिसमसवर आधारीत होती. त्यामुळे अनेक नेटीझन्सना हा प्रकार आवडला नाही. त्यांनी अमृता यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.
launched-Be Santa-campaign, as Ambassador for @927BIGFM - to collect gifts from people -for poor children ,to bring smiles to their faces during this Christmas.Drop ur gifts at nearest @927BIGFM & Feel the joy -as best way to multiply your happiness is by sharing it with otherspic.twitter.com/r5UTAi3nDY
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 12, 2017
ट्विटरवर अमृता फडणविस यांच्याबाबाबत अनेक प्रतिक्रीया पहायला मिळाल्या. यात एका यूजरने लिहिले की, 'अमृता फडणवीस या लग्नापूर्वी हिंदू होत्या?' तर, दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, 'अमृता फडणवीस यांनी हिंदू सण, उत्सवांनाही प्रमोट करायला हवे.'
Love , sharing & empathy have no religion - let’s accept all positivity around us & stay away from negative thoughts & demotivating energies ! @ShefVaidya
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 12, 2017
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी चॅरिटेबल इव्हेंटचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टॅग करून लिहिले आहे की, 'प्रेम, शेअरींग आणि सहानुभूतीचा कोणताही धर्म असत नाही. आमच्या आजुबाजूच्या सकारात्मकतेला आपण स्विकारले पाहिजे. तर, नकारात्मकतेपासून दूर रहायला हवे.' अमृता फडणवीस यांचे ट्विट पाहताच यूजर्सनी त्यांना जोरदार ट्रोल केले.
I’m a proud Hindu & like many, I celebrate every festival in my country & that is an individual choice.... We represent the true spirit of our country ... and that doesn’t dilute our love towards our country , religion & humanity ....
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 12, 2017
दरम्यान, हे पहिल्यांदाच घडत नाही. यापूर्वीही भाजपसह अनेक राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, खेळाडू, सेलिब्रेटी, लोकप्रिय व्यक्ती ट्रोलची शिखार बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आणि तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही सेल्फीमुळे ट्रोल झाल्या होत्या.