मुंबई : Diesel petrol prices hike:प्रदीर्घ काळानंतर डिझेल-पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80 पैशांनी वाढणार आहेत. वाढलेले दर उद्यापासून म्हणजेच मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.
गेल्या 137 दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. 137 दिवसांपासून डिझेल-पेट्रोलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नसला तरी घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
त्यात अचानक मोठी वाढ झाली आहे, त्यातही थेट 25 रुपयांनी मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत घाऊक ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, असे मानले जात होते.
जागतिक बाजारपेठेतही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. रशिया युक्रेन युद्धाआधी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या खाली होते. आज ते 118 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत.
अनेक दिवसांनी डिझेल-पेट्रोलच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आजपासून (मंगळवार) लागू झाले आहेत.