अजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड

आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Updated: Nov 23, 2019, 08:28 PM IST
अजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड title=

मुंबई : आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि आता दिलीप वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकींमध्ये त्यांची एकमताने निवड झाली. यापूर्वी ते विधानसभेचे अध्यक्ष देखील राहिले होते. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पाहिल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या.

आज महाराष्ट्राच्या राजकाणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. त्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. सध्या राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.

परंतु, त्यांची भेट फेल ठरली. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या नेत्यांनी माध्यमांसोबत कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांना पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.