मुंबई : संप केल्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दिलासा दिलाय. या सगळ्या १ हजार १० कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांना आदेश दिले होते. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना उदार मनानं माफ करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांना केलं होतं.
बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची विनंती केली होती.
८, ९ आणि १० जूनला एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे रोजंदारी गटात मोडणाऱ्या १०१० कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती.