पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनियापासून दूर राहण्यासाठी या 5 गोष्टी करा

पावसाळा जवळ आला की, अनेक आजार देखील वाढतात. त्यामुळे अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे. 

Updated: Jul 28, 2021, 03:49 PM IST
पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनियापासून दूर राहण्यासाठी या 5 गोष्टी करा title=

मुंबई : भारत हा असा एक सुंदर देश आहे, जिथे सर्व प्रकारचे हवामान अनुभवायला मिळते. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. पण हवामानातील बदलामुळे आपल्या शरीरावर देखील त्याचा परिणाम होत असतो. खासकरुन पावसाळ्यात व्हायरल आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात सर्वात मोठा धोका डेंग्यू ( dengue ) आणि मलेरियाचा ( malaria ) आहे, ज्याचा परिणाम भारतातील कोट्यावधी लोकांवर होतो. याला आपण वेक्टर-जनित विषाणूचा रोग म्हणतो, जो एडीज एजिप्टी नावाच्या डासांद्वारे पसरतो. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूला साठवून ठेवलेल्या शुद्ध पाण्यात वाढतात.

तज्ञांचं असं मत आहे हे की, खबरदारी घेतल्यास कोणताही रोग बरा होऊ शकतो. हे खरे आहे की पावसाळ्यात वेक्टर-जनित विषाणूजन्य आजाराचा धोका असतो, म्हणून हे टाळण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. 

1. सूर्यास्तापूर्वी खिडक्या आणि दारे बंद करा

सूर्यास्तापूर्वी घराच्या सर्व खिडक्या आणि दारे बंद करा. कारण असे आढळले आहे की डास सामान्यतः सूर्यास्तादरम्यान आणि नंतर अधिक सक्रिय असतात.

2. पूर्ण कपडे घाला

एडीस एजिप्टी डास कोणत्याही वेळी आक्रमण करू शकतो, म्हणून नेहमी सतर्क राहणे खूप महत्वाचे आहे. आपण घरी असाल किंवा बाहेर, आपले शरीर शक्य तितक्या कपड्यांनी झाकून ठेवा. तुम्ही फुल स्लीव्ह शर्ट, कुर्ता, फूल पॅन्ट, पायजमा घालावे. तसेच मुलांना देखील पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालायला लावा. महिलांनीही याबाबत लक्ष दिले पाहिजे. शरीर जितके जास्त झाकलेले असेल तितके आपण डासांपासून सुरक्षित राहू शकतो.

3. झोपताना मच्छरदाणी वापरा

पावसाळ्यात पाणी साचते, ज्यामुळे डासांची पैदास देखील होते. डासांपासून दूर राहण्यासाठी आपण नेहमीच मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. डास आणि इतर रोगजन्य कीटक झोपे दरम्यान दूर ठेवण्यासाठीठ हा एक सोपा, प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. 

4. आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवा

असे दिसून आले आहे की जो माणूस स्वत: ला स्वच्छ ठेवतो आणि सभोवताल स्वच्छ ठेवतो, रोग त्याच्यापासून दूर राहतो. विषाणूजन्य रोग टाळण्यासाठी आपण स्वतः तसेच आपले घर स्वच्छ करणे महत्वाचे आहे. आजूबाजूला पाणी साचत नाही याची खात्री करुन घ्या. टेरेसवर पाणी जमा होत असल्यास ते नियमितपणे स्वच्छ करा. तसेच, आपल्या सभोवताली औषधे फवारणी करा.

5. आपल्या आहाराकडे लक्ष द्या

जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा त्याचा जास्तीत जास्त परिणाम दिसून येतो. म्हणूनच, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याकडे लक्ष द्या. आपण पौष्टिक पदार्थ खायला हवेत. आपल्या आहारात ताजे फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात असाव्यात. यासह तुम्ही भरपूर पाणीही प्यावे.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे वेक्टर-जनित विषाणूजन्य रोग पावसाळ्यात दरवर्षी आढळतात. त्यांचा प्रभाव खेड्यांमध्ये तसेच लहान मोठ्या शहरांमध्येही दिसून येतो. हा रोग मोठा आहे, म्हणून आपण अधिक सावध असणे आवश्यक आहे.