इस्टर्न एक्स्प्रेस वेवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी

मुलुंडमध्ये इस्टर्न एक्स्प्रेस वेवरील खड्ड्यांनी एका डॉक्टरचा बळी घेतलाय. डॉक्टर प्रकाश वझे हे ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येत असताना त्यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झालाय.

Updated: Dec 8, 2017, 10:32 PM IST
इस्टर्न एक्स्प्रेस वेवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी title=

मुंबई : मुलुंडमध्ये इस्टर्न एक्स्प्रेस वेवरील खड्ड्यांनी एका डॉक्टरचा बळी घेतलाय. डॉक्टर प्रकाश वझे हे ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येत असताना त्यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झालाय.

कसा झाला अपघात?

आनंदनगर टोलनाका परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे वझे यांच्या स्कूटरचा तोल गेला...आणि ते रस्त्यावर पडले...त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. वझे यांच्यासोबत त्यांचे सहकारी नागप्पा हेगडे हे देखील होते. त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

मुलुंडमध्ये हळहळ

एक कुशल डॉलर आणि क्रीडाप्रेमी अशी डॉक्टर प्रकाश वझे यांची मुलुंडमध्ये ख्याती होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळं मुलुंडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत.