बिबट्याचा हल्ला, थरार पाहा, कसं कुत्र्याने बिबट्याला पळवून लावलं

बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली तर कुत्र्याचं काय होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही...

Updated: Dec 11, 2019, 12:03 AM IST
बिबट्याचा हल्ला, थरार पाहा, कसं कुत्र्याने बिबट्याला पळवून लावलं

मुंबई : बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली तर कुत्र्याचं काय होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही... मुंबईतल्या सीप्झ भागात असाच एक बिबट्या दबक्या पावलानं आला आणि त्यानं कुत्र्यावर हल्ला केला.. पुढं काय झालं, तुम्हीच पाहा...

रविवारची मध्यरात्र... मुंबईतल्या सीप्झ परिसरात  सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला हा थरार... इथं बिबट्यांचा सर्रास संचार असतो. त्यापैकीच हा एक बिबट्या... तो आला... दबक्या पावलांनी... आणि त्यानं अचानक एका भटक्या कुत्र्यावर हल्ला केला.

शिकाऱ्याच्या तावडीत सापडलेला कुत्रा जीवाच्या आकांतानं तडफडत होता... बिबट्यानं थेट नरडीचाच घोट घेतलेला... त्यामुळं कुत्रा वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच... पण कुत्र्याच्या अंगात कुठून शक्ती आली, कळलं नाही... त्यानं चक्क बिबट्याला पळवून लावलं.

हर कुत्ता अपनी गली में शेर होता है, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं...