डॉ. पायल तडवी प्रकरण :तिन्ही आरोपींना सस्पेंड करण्याची 'वंचित'ची मागणी

तीन आरोपींना सस्पेंड करण्याची मागणी

Updated: Oct 12, 2020, 04:04 PM IST
डॉ. पायल तडवी प्रकरण :तिन्ही आरोपींना सस्पेंड करण्याची 'वंचित'ची मागणी title=

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या प्रकरणी एंटी रॅगिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार तीन आरोपींना सस्पेंड करण्याची मागणी वंचितने केली. पण अद्याप त्यावर कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे वंचित आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

अँटी रॅगिंग कमिटी जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार तीन आरोपींना सस्पेंड करायला हवे होते. पण नायर हॉस्पिटल, राज्य सरकार यांनी कोणतीही कारवाई केली नाही, कारवाई न करणं ही न्यायाची कुचेष्टा असल्याचे वचिंत बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलंय. 

यासाठी नायरच्या अधिष्ठातांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.तीन आरोपी पुन्हा आतमध्ये आल्यानंतर चौकशी वर प्रभाव पाडू शकतात असे त्या म्हणाल्या. या सगळ्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी हस्तक्षेप करणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासंदर्भात वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 

काय आहे प्रकरण ?

डॉ. पायल सलीम तडवी ही अनुसूचित मुस्लिम तडवी भिल समाजातील आणि त्यांच्या गावातील डॉक्टरकीच शिक्षण घेणारी पहीली महीला होती. जळगाव येथून पहिली पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिने मुंबई येथील टोपीवाला नॅशनल कॉलेज एंड नायर हॉस्पीटलमध्ये प्रवेश घेतला.  शिक्षण घेत असताना त्याच कॉलेज मध्ये शिकत असलेल्या ३ सिनिअर मुली (हेमा अहुजा, भक्ती मेहेर, अंकिता खंडेलवाल) या नेहमी तिची रॅगिंग करत असल्याचा आरोप करण्यात आला. तडवी यांना त्या नेहमी जातीवरून चिडवत. तडवी यांची जवळची मैत्रीण स्नेहल शिंदे यांना सुद्धा त्या त्रास देत होत्या असे या प्रकरणी समोर आले. 

या सर्व त्रासाला कंटाळून तडवी यांनी २२ मे २०१९ रोजी आत्महत्या केली. या घटनेनंतर लगेच आगरीपाडा पोलिसांनी ३ मुलींना अटक केलं. तडवी परिवाराच्या विनंतीवरून केस क्राईम ब्रांच कडे सुपूर्त केली. दोन महिन्यानंतर मुंबई पोलिसांनी १२०३ पानांची चार्जशीट दाखल केली.

९ ऑगस्ट ला मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी २ लाख रुपये, एक दिवसाआड हजर राहणे, मुंबई च्या बाहेर प्रवास न करने आणि कॉलेज अथवा हॉस्पिटलमध्ये जाण्यास मनाई या अटीवरती जामीन मंजूर केला. फेब्रुवारी २०२० मध्ये राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आरोपी महिलांनी केली. ही मागणी मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली आणि विशेष न्यायालयाने १० महिन्यामध्ये चाचणी पूर्ण करण्याची मर्यादा घातली.

स्त्रीरोगशास्त्र प्रमुख डॉ. यी. चिंग. लिंग (BYL Nair Hospital) यांची चौकशी करण्याचे पत्र तयार केले आहे. डॉ. चिंग यांच्याकडे पायलने वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी योग्य ती दखल घेतली नसल्याचे चौकशीत समोर आलं. ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी कोर्टाला यासंदर्भात माहिती दिली. मार्च २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाकडे आरोपींनी अर्ज केला असता कोर्टाने  ८ ऑक्टोबरला त्यांना राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली. महाराष्ट्र सरकार आणि पायल तडवी यांच्या परिवाराने या निर्णयाचा विरोध केला आहे.