मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS MAHARASAHTRA ) मस्जिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. त्यातच आता मनसेने नवी भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावण्यात आले आहेत. परंतु, मशिदींमध्ये CCTV आहेत का? असा सवाल मनसेचे बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केलाय.
'सर्वधर्मीय' प्रार्थनास्थळात CCTV यंत्रणा का असू नये? असे विचारतानाच असे CCTV बसविल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल असे करण्यास कोणाचाही आक्षेप नसावा.
सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय.