मोठी बातमी : अनिल देशमुख यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

अनिल देशमुख आता तरी चौकशीला हजर राहणार का? 

Updated: Aug 17, 2021, 11:52 AM IST
मोठी बातमी : अनिल देशमुख यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स title=

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून पुन्हा समन्स पाठवण्यात आला आहे. बुधवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीने आदेश दिले आहेत. 
महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुखांना पाठवण्यात आलेला हा पहिला किंवा दुसरा समन्सनसुन पाचवा समन्स आहे. त्यामुळे अनिल देशमुख आता तरी चौकशीला हजर राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.  

दरम्यान,  ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे. त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. याआधी अनिल देशमुख यांना चार वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आला. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. आता पाचव्यांदा समन्स बजावल्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 
 
याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला. त्यानंतर अनिल देशमुख आणि इतरांविरोधात  देखील ईडीने गुन्हा दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे ईडीने अनिल देखमुख आणि  त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या.