'एकनाथ खडसे असते तर ही वेळ आली नसती'

महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं. 

Updated: Nov 26, 2019, 05:09 PM IST
'एकनाथ खडसे असते तर ही वेळ आली नसती' title=

मुंबई: विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना मंगळवारी भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतली. सभागृहात बहुमत सिद्ध करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ खडसे असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया आपल्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत असल्याचे नाथाभाऊंनी सांगितले. ते मंगळवारी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. 

अजित पवार राजकीय संन्यास घेणार ?

यावेळी त्यांनी म्हटले की, मला आतापर्यंत हजारो लोकांचे फोन आले. तुम्ही राजकारणात असता तर युती तुटली नसती. महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं. सध्या जे संकट आलंय तेही आले नसतं, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. 

सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर

यावेळी एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. हा केवळ योगायोग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या नऊ प्रकरणांची चौकशी बंद केली असली तरी इतर प्रकरणांची चौकशी सुरुच राहणार आहे. मात्र, सरकराने हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.