Vedanta Project : वेदांतबाबत कोण खरं, कोण खोटं?

वेदांत प्रकल्प (vedanta project) राज्याबाहेर नेमका कुणामुळे गेला, कोण खरं कोण खोटं यावरुन शिंदे-ठाकरे-भाजपत तुफान आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.  

Updated: Nov 2, 2022, 11:59 PM IST
Vedanta Project : वेदांतबाबत कोण खरं,  कोण खोटं? title=

मुंबई :  वेदांत प्रकल्प (Vedant Project) नेमका कुणामुळे राज्याबाहेर गेला. ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) की शिंदे सरकार (Eknath Shinde) यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण त्याचवेळी MIDCकडून माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. काय म्हटलंय MIDCने पाहुयात. (eknath shinde or uddhav thackeray who will responsible to vedanta project move on out of maharashtra see full report)

वेदांत प्रकल्प राज्याबाहेर नेमका कुणामुळे गेला, कोण खरं कोण खोटं यावरुन शिंदे-ठाकरे-भाजपत तुफान आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच MIDCकडून माहिती अधिकारातून जी माहिती समोर आलीय त्यातून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळेच वेदांत महाराष्ट्राबाहेर गेला असं माहिती अधिकारातून समोर आलंय. MIDCकडून मिळालेल्या माहितीनुसार..

MIDC च्या माहितीनुसार, 5 जानेवारीला वेदांताने गुंतवणुकीसाठी तयारी दाखवली. पण 5 जानेवारीनंतर 5 मे पर्यंत कोणताही पत्रव्यवहार झाला नाही. वेदांताने 5 मे रोजी पुन्हा पत्रव्यवहार केला. 14 मे रोजी MIDCकडे वेदांताकडून गुंतवणुकीसाठी पुन्हा अर्ज. आघाडी सरकारकडून साडेचार महिने प्रस्तावावर कार्यवाही नाही. 

तत्कालीन ठाकरे सरकारकडून दिरंगाई झाली हे खरं आहे पण राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांकडून 26 जुलैला वेदांतच्या अधिका-यांसोबत बैठक पार पडल्याचंही MIDCकडून स्पष्ट करण्यात आलंय. 27-28 जुलैला कंपनीच्या अधिका-यांनी तळेगावमधल्या प्रस्तावित जागेला भेट दिली होती. 5 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरला प्रकल्पासंबंधी वेदांताला पत्र लिहिण्यात आलं होतं. थोडक्यात ठाकरे सरकारनं दिरंगाई केली पण शिंदे सरकारही बैठका आणि पत्रव्यवहारानंतर वेदांताला रोखू शकले नाहीत

राज्यात सत्तांतर होत होतं त्याच काळात वेदांत राज्याबाहेर जात होता. शिंदे-ठाकरे वादामुळेच महाराष्ट्राच्या वाटेच्या लाखो नोक-या गुजरातला मिळाल्या आणि महाराष्ट्रातला तरूण यात भरडला गेला हेच कटू सत्य.