अभियंता भेटत नसल्याने खुर्चीच उचलून आणली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणाचा वाद झी 24 तासनं उघडकीस आणला.

Updated: Apr 11, 2018, 05:35 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणाचा वाद झी 24 तासनं उघडकीस आणला. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी कार्यालयातून कार्यकारी अभियंता सांगळे यांची खुर्चीच उचलून नेली आहे. वारंवार विनंती करूनही सांगळे मनसेच्या शिष्टमंडळाला भेटायला टाळाटाळ करत होते. त्यामुळं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्चीच उचलून नेली. शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी ही खुर्ची आणून ठेवली आहे.