राज्यपालांकडून न्याय मिळेल ही अपेक्षा - मंत्री विजय वडेट्टीवार

OBC Reservation : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काल ओबीसी 50 टक्के बिलावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून आभार मानायला आलो होतो, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

Updated: Feb 2, 2022, 12:05 PM IST
राज्यपालांकडून न्याय मिळेल ही अपेक्षा - मंत्री विजय वडेट्टीवार title=

मुंबई : OBC Reservation : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काल ओबीसी 50 टक्के बिलावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून आभार मानायला आलो होतो, अशी माहिती राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी टोलाही लगावला. OBCशी निगडित इतरही काही बिलांवर सही करावी ही विनंती केली, न्याय मिळेल ही अपेक्षा, असे ते म्हणाले. (Vijay Vadettiwar On Reservation)

ओबीसी  बिलाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांनी किमान अंतरिम अहवाल पाठवावा, आयोग सकारात्मक वाटतं आहे, अहवाल आला तर निवडणूक आयोगाकडे पाठवू. तसेच 8 तारखेच्या निर्णयावर अधिक गोष्टी अवलंबून आहेत, कायद्याच्या चौकटीत कसे बसेल हे बघावे लागेल, अशी माहिती यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होती. त्यांना (राष्ट्रवादी) वाटलं म्हणून ते गेले. आम्ही संघटक म्हणून गेलो होतो. ओबीसी हिताचा निर्णय जो कोणी घेईल, उद्या फडणवीस यांनी निर्णय घेतला तर त्यांचंही अभिनंदन करु, असे ते म्हणाले.

27 टक्के आरक्षण हा आमचा अधिकार आहे आणि तो मिळावा. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय आरक्षण वगळून आरक्षण मिळेल. यामुळे काही जिल्हात कमी जास्त आरक्षण मिळेल. 243 बी आणि डी  यामध्ये केंद्र सरकार सुधारणा केली तर प्रत्येक राज्यात ओबीसींना आरक्षण मिळेल.  27 टक्के आरक्षण आता भाजपने लागू करावी. केवळ बाता मारु नये, असा टोला त्यांनी भाजपला यावेळी लगावला.