मुंबई : 'नवसाला पावणारा विश्वाचा राजा' अशी ओळख असणारा वडाळ्याचा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक ओळखला जातो.
यंदा मुंबईत जी.एस. बी गणेशोत्सव मंडळ ६३ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
१९५५ साली जी. एस. बी समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवास सुरूवात केली. त्याकाळी लहान स्वरूपात सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्य दिव्य झाली आहे.आजही मुंबईत जी.एस.बी समाजातील व्यक्ती एकत्र येऊन गणेशपूजा करतात.
जी.एस. बी मंडळाची वैशिष्ट्य -:
जी.एस. बी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेशमूर्तीची स्थापना केवळ ५ दिवसांसाठी किंग सर्कल येथील जी.एस. बी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली जाते.
जी. एस. बी गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.
जी.एस.बी मंडळाची ओळख सगळ्यात श्रीमंत गणपती अशी होते. कारण या गणेशमूर्तीवर ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर करून आभूषण आणि सजावट केली जाते.
यंदा या गणेशोत्सव मंडळाने २६४.२५ करोड रूपयांचा विमा उतरवला आहे.
जी.एस.बी मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक किंग सर्कल येथून सुरू होते आणि विसर्जन हे गिरगाव चौपटीवर केले जाते. ही मिरवणूक सुमारे १२ तासांची असते.