शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय. 

Updated: Aug 22, 2017, 03:58 PM IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा title=

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय. 

पुढच्या महिन्यातल्या १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुक्यानुसार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार आहे. कर्जमाफी दिल्यानंतर १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असून प्रत्यक्ष कर्जवाटपाचीही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

२१ ऑगस्टपर्यंत २१ लाख ५७ हजार ३४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर १७ लाख ९५ हजार १०४ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.