शेतकरी शेतीपंपाचं बिल भरतील, पण लुटीचे पैसे नाही? महावितरण हॉर्स पावर वाढवून लुटतंय

महावितरणने शेतकऱ्यांची बिलाच्या माध्यमातून लूट सुरु केली आहे, ती लू्ट त्यांनी बंद करण्याची गरज आहे, ती चूक असेल तर ती त्यांनी सुधारली नाही, तर ती लूटच म्हटली जाणार 

Updated: Mar 7, 2022, 03:28 PM IST
शेतकरी शेतीपंपाचं बिल भरतील, पण लुटीचे पैसे नाही? महावितरण हॉर्स पावर वाढवून लुटतंय title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : महावितरणने शेतकऱ्यांची बिलाच्या माध्यमातून लूट सुरु केली आहे, ती लू्ट त्यांनी बंद करण्याची गरज आहे, ती चूक असेल तर ती त्यांनी सुधारली नाही, तर ती लूटच म्हटली जाणार आहे, वाढवलेल्या हॉर्स पावरचे पैसे शेतकरी वीजबील म्हणून का भरणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यानी शेतात ३ हॉर्से पावरचे पंप लावलेले आहेत, आजही विहिरीवर जावून तपासतले तरी तिथे ३ हॉर्स पावरचे पंप आहेत. तरी देखील वीज बिलावर ५ हॉर्स पावर असं लिहून येतं. महावितरणकडून ही लूट मागील ५ वर्षापासून सुरु आहे.

जे शेतकरी ३ हॉर्स पावरचे पंप वापरत आहेत, त्यांच्याकडून ५ हॉर्स पावरप्रमाणे वीज वसुली केली जात आहे, ही महावितरणकडून शेतकऱ्यांची होणारी लूट आहे, या बदल्यात काही उद्योजकांना चोरुन वीज दिली जात आहे, ती वीज वसूल होत नाही, ती भर काढण्यासाठी शेतकऱ्यांना असं फसवलं जात असल्याची चर्चा आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविषयी महावितरणला अर्ज दिलेले आहेत, पण अजूनही हॉर्स पावर कमी न करता ही लूट सुरु आहे.

शेतकऱ्यांना फसवून परस्पर हॉर्स पावर वाढवून महावितरण लूट करतंय, याबाबतीत ज्या महावितरणच्या अधिकाऱ्यानी हा निर्णय घेतला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, ही लूट नेमकी कुणाच्या खिशात जात आहे, हा देखील सवाल विचारला जात आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सहा महिने वीजेचा वापर नसतो, विहिरीत उन्हाळ्यात पाणी नसतं, पावसाळ्यातही विहिरीला सप्टेंबर महिन्यात पाणी येतं, तोपर्यंत पावसाच्या पाण्यावर भागतं, या सहा महिन्याचं बिल देखील महावितरण लाखोच्या घरात शेतकऱयांना देतंय, त्यामुळे शेतकरी वीज बिल भरत नाहीत.