शेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार

1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 22, 2017, 03:25 PM IST
शेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार title=

मुंबई :  1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.

असहकार आंदोलन पुकारणार

यासाठी असहकार आंदोलन पुकारणार, कुठलाही शेतीमाल शहरात येणार नाही, औरंगाबादमध्ये झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

दीड लाखांची कर्जमाफी फसवी

शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकारनं कुठलेही ठोस उपाय केले नाहीत, दीड लाखांची कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफी सरसकट हवी, अशी मागणी शेतकरी नेत्यांची आहे.

बोंडबळीचा प्रश्न

बोंडबळीचा प्रश्न, कापसाचा भाव ,उसाचा भाव या सर्व बाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप या नेत्यांनी केले आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

17 जानेवारीला सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, तसेच या मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर संप अटळ असल्याचं सांगण्यात येत आहे.