शेतकरी कर्जमुक्ती : भाजप-शिवसेनेत तणाव वाढला

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज युतीतला तणाव वाढला आहे. आज शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीत गैरहजेरी नोंद केली. दरम्यान, शिवसेना मंत्र्यांनी रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Updated: Jun 7, 2017, 01:01 PM IST
शेतकरी कर्जमुक्ती : भाजप-शिवसेनेत तणाव वाढला  title=

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज युतीतला तणाव वाढला आहे. आज शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीत गैरहजेरी नोंद केली. दरम्यान, शिवसेना मंत्र्यांनी रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन शिवसेना प्रमुख देशाबाहेर असल्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका जाणून घ्यावी आणि मग पुढचे निर्णय घ्यावे, अशी मागणी एका पत्राद्वारे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत न जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या घरी निघून गेले.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असं मंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात आज शिवसेनेच्या मंत्र्याशिवाय राज्य कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठक झाल्यावर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला नसून परवानगी घेऊन अनुपस्थित राहिले, असे सांगून सारवासारव मंत्री मुनगंटवारी यांनी केली.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झालेय. याशिवाय, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दीपक सावंत, दिवाकर रावते यांनीदेखील गैरहजर राहत बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाल्यापासूनच शिवसेनेने सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेत शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आले नव्हते. आजदेखील राज्यमंत्रिमंडळ बैठकीला उपस्थितीत न राहता शिवसेनेने आधी संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी मागणी केली.