मुंबई : फटाके विक्रेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी फटाके विक्रेत्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या.
सरसकट फटाक्यांची दुकानं बंद होता कामा नये आणि तसे आदेश नसतानाही पनवेल भागात दुकानं बंद केली जात आहेत. मुंबई महापालिकेतही अनेक ठिकाणी परवानग्या रद्द करण्यात आल्यात, अशी अडचण फटाके विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावर न्यायालयाचे नेमके आदेश तपासून योग्य मार्ग काढू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी फटाके विक्रेत्यांना दिलं.
तर हवामानात बदल होतोय, अवेळी पाऊस पडतोय हे सर्व प्रदूषणामुळे होतंय. प्रदूषण रोखणं हे या खात्याचा मंत्री म्हणून माझं काम आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम हातात घेतलीय, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पहिल्यापासून पाठिंबा होता... ते आमची बाजू सरकारसमोर मांडतील असा विश्वास फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केलाय.