मिस्टर गुवाहाटी ...काही तरी सोडा आमच्यासाठी; पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर अंतर्गत नाराजीचा सूर

मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत भाजपच्या माजी नगरसेवकाची टीका

Updated: Sep 25, 2022, 07:23 PM IST
मिस्टर गुवाहाटी ...काही तरी सोडा आमच्यासाठी; पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर अंतर्गत नाराजीचा सूर title=

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तब्बल दीड महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर केली. शिवसेनेचे (shivsne) प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी शिंदे गटाच्या (shinde group) मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मात्र ठाणे (thane) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा घोषनेनंतर भाजप माजी नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या कामावरून मंत्री रविंद्र चव्हाण (ravindra chavan) आणि शिंदे गटातील वाद समोर आला होता. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई (shambhuraj desai) यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकाने फेसबुकवर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे. (Former BJP corporator expressed displeasure after CM announcement Thane District Guardian Minister)

मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत भूमिपुत्रांसाठी काही तरी सोडा अशी फेसबुक पोस्ट भाजपचे माजी नगरसेवक मंदार तावरे यांनी केली आहे. "व्हा रे... व्हा मिस्टर गुवाहाटी आम्हाला पालकमंत्री पण दिलात तो घाटी... काय तरी सोडा इथल्या भूमीपुत्रांच्या हाती... नाहीतर परत लढावा लागणार आमच्या अस्मितेसाठी...," अशी पोस्ट मंदार तावरे यांनी केली आहे.

Former BJP corporator mandar taware

दरम्यान, कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं . त्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला तो आजतागायत थांबलेला नाही.