एक होती गंगुबाई... मुंबईची पहिली महिला माफिया क्वीन

एक होती गंगुबाई...

Updated: Mar 10, 2021, 08:36 PM IST
एक होती गंगुबाई... मुंबईची पहिली महिला माफिया क्वीन title=

प्रशांत सोनार, मुंबई : गंगूबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi)हे नाव अनेकांना माहित असेल आणि नसेलही. मूळ नाव गंगा हरजीवनदास काठीयावाडी, मूळची गुजरातची. गंगूबाईचा जन्म १९३९ मध्ये एका साध्या, संपन्न अशा कुटुंबात झाला. तिचं कुटुंब वकिली व्यवसायाशी जोडलेलं होतं. गंगूबाई ही त्या परिवारातील एकूलती एक मुलगी होती. पण लहानपणापासून गंगूबाईला बॉलिवडूच्या अभिनेत्रींची भूरळ होती. (Who Was Gangubai Kathiawadi) 

अभिनेत्री आशा पारेख, हेमामालिन सारखं बनावं अशी तिची इच्छा. अभिनेत्री होण्याचं ते स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं आणि कोणी विचारही केला नसेल असं काही घडलं. गंगूबाईला नेहमीच चित्रपटात काम करावं असं वाटायचं. त्या स्वप्नांसाठी बॉलिवूडची नगरी असलेल्या मुंबईचं देखील आकर्षण हळूहळू वाढत गेलं आणि अशातच मुंबईतील एक मुलगा रमणीकलाल तिच्या वडिलांचा अकाउंटंट बनून आला. (life of Gangubai Kathewali)

अवघ्या १६ वर्षाची असलेल्या गंगूबाईला आपली स्वप्नं ह्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी भाबडी आशा वाटली. गंगूबाई त्या मुलाच्या प्रेमात पडली. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं; तेही फिल्मी स्टाईलनेचं घरातून पळून कारण गंगूबाईला ह्या लग्नासाठी घरातूनच विरोध होता. 

आपलं नशीब आजमविण्यासाठी ती आपल्या पतीसोबत मुंबईत आली. काही काळानंतर या कोवळ्या अशा गंगूबाईवर तिच्या नवऱ्याने अत्याचार केला. अवघ्या ५०० रुपयांसाठी तिला मुंबईतील रेड लाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात तिची फसवणूक करून तिला वेश्या व्यवसायात ढकललं. (Gangubai's story)

तेव्हा पासून गंगूबाईच्या नशिबानं आपली कूस बदलली. अशा परिस्थितीत आपले कुटुंबीय आपला स्विकार करणार नाही ह्या जाणीवेने तिने ह्या परिस्थिती सोबत तडजोड केली.

एक होती गंगुबाई... मुंबईची पहिली महिला माफिया क्वीन

अत्याचाराची ही मालिका इथे संपलीच नव्हती. हुसेन जैदी यांच्या कादंबरीतील उल्लेखानुसार माफिया डॉन करीम लाला (Karim Lala) याच्या गँगमधील एका गुंडाने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर ती न्यायासाठी करीम लाला ह्याला भेटली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने राखी बांधून त्याला आपलं भाऊ देखील मानलं. त्यामुळे तिचा धाक वाढला आणि फिमेल डॉन/ माफिया क्वीन अशी तिची नव्यानं ओळख बनली.(Mafia Queens Of Mumbai)

तिने मुंबईतील कामाठीपुरात स्वत:चे कोठे सुरू केले. असं सांगितलं जातं की ती कुठल्याही मुलीला तिच्या इच्छे विरुद्ध कोठ्यावर घेत नव्हती. एवढंच नाही तर विश्वासघात करून कोठ्यावर आणलेल्या महिलांना तिने परत त्यांच्या घरी पाठवलं. पुढे तिने आपल्या प्रसिद्धीचा, ताकदीचा, अधिकाराचा वापर वेश्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तसंच त्यांना सशक्त करण्यासाठी केला. (owner of Mumbai's Kamathipura area)

गंगूबाईची दुसरी ओळख म्हणजे मुंबईतील हिरामंडी (Hiramandi) येथे ती कोठा चालवायची आणि देशातील इतरही भागात ती हा व्यवसाय काढणारी पहिली महिला होती. (sex worker in Kamathipura) पुढे महिला सशक्तीकरण आणि महिला अधिकारासाठी लढणाऱ्या गंगूबाईने स्थानिक राजकारणात उडी मारली आणि त्यात यश मिळवलं. 

६०च्या दशकातील भाषणाची दखल त्या वेळच्या मोठ्या वृत्तपत्रांनी, तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली. गंगूबाईंचं पुढे कार्य एवढं वाढत गेलं की सेक्स वर्कर्स त्यांना 'गंगूमॉं' (Gangu maa)देखील म्हणत. अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा त्या घेत असत. गंगूबाईने वेश्या व्यवसायातील महिलांसदर्भात केलेल्या कार्यामुळे आयुष्याच्या शेवटानंतरही गंगूबाईंचा फोटो आजही कामाठीपुऱ्यातील कोठ्यांच्या भिंतीवर आढळतो.

(इंटनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार)