घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा

घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.  

Updated: Jul 25, 2017, 10:05 PM IST
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा title=

मुंबई : घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.  

मृतांची नावे 

१) रंजनबेन शहा (६२)
२) सुलक्षणा खानचंदानी ८०
३) रेणुका ठक ३ महिने
४) मनसुखभाई गज्जर ७५
५) अमृता ठक ३१
६) पंढरीनाथ डोंगरे ७५
७) दिव्या पारस अजमेरा (४८)
८) मिकूल खानचंदानी (२२)
९) ऋत्वी प्रितेश शहा (१४)
१०) किशोर खानचंदानी (५०)
११) मनोरमा डोंगरे (७०)
१२) क्रिषू डोंगरे (१३ महिने)

 घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचं बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आलंय. शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील शीतप याचं हे रुग्णालय असल्याचं उघड झालंय. त्यानं विद्या खाडे नावाच्या महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होतं. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे हॉस्पिटल सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करताना आतले कॉलम तोडण्यात आले होते.

सुनील शितपनं रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांना रहिवाशांनी विरोध दर्शवला होता. रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता शितपनं जबरदस्तीनं हे काम सुरू ठेवलं होतं. तसंच रहिवाशांना धमकावल्याचंही बोललं जातंय. या  बांधकामामुळंच इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनीही केलाय. तर दुसरीकडे या दुर्घटनेला जबाबदार धरून एन वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला.पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीचा त्यांच्यासमोरच अंत झाला. तर आई अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे. त्यांचा नऊ वर्षांचा  मुलगा ट्युशनला गेल्यामुळे सुदैवाने बचावला. घाटकोपरमधील बिल्डिंग ही नर्सिंग होमच्या बांधकामामुळे पडल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहेत.