मुंबई : मध्यरेल्वेच्या दादर स्टेशनवर सोमवारी रात्री एका महिलेने मुलीला जन्म दिला. दादर स्टेशनवर असणाऱ्या वन रुपी क्लीनकमध्ये काम करणारे डॉ. प्रज्वलित यांनी त्या महिलेची प्रसुती सुकर केली.
सलमा शेख असे प्रसुत महिलेचे नाव असून बाळ आणि त्याची आई सुखरुप आहेत. यावेळी दादर स्टेशनवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनीही महिलेला मदत केली.
याआधी जुलै महिन्यात वन रुपी क्लीनकच्या डॉक्टरांनी घाटकोपरमध्येही एका महिलेची प्रसुती केली होती.