Good News : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

 मुंबईत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार. 

Updated: Oct 11, 2018, 11:41 PM IST
Good News : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

मुंबई : शहरातील म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. अनेकदा लॉटरी काढूनही म्हाडाची काही घरं विकली जात नव्हती. त्यामुळे विकल्या न गेलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. 

उदय सामंत यांनी म्हाडाचे अध्यक्ष म्हणून ताबा घेतल्यानंतर आता किंमतींचा आढावा घेतला जाईल. शुक्रवारी प्राधीकरणाच्या बैठकीत किंमती किती टक्क्यांनी कमी होणार हे ठरवलं जाईल. लोअर परळमध्ये असलेलं १ कोटी २० लाखांचं घरही आता कमी किंमतीत मिळेल.