राज्य आंधारात, कोळसा मात्र राजस्थान, मध्यप्रदेशात - राष्ट्रवादी

महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा निवडणुकी जाहीर झाल्यांने त्या राज्यांना दिला जात असल्याचा आरोप.

Updated: Oct 11, 2018, 10:14 PM IST
राज्य आंधारात, कोळसा मात्र राजस्थान, मध्यप्रदेशात - राष्ट्रवादी

मुंबई : राज्यातल्या भारनियमनावरून राजकारण तापलंय. महाराष्ट्राला अंधारात ढकलून राज्यातला कोळसा मध्य प्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

शेजारील राज्यांमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत.   या राज्यात भाजपाचे सरकार आहे. तिथे आता निवडणुका आहेत, त्यामुळे तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा त्या राज्यांना दिला जात असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. ऊर्जामंत्री बावनकुळे यांची हकालपट्टी करण्याची मागणी मलिकांनी केलीय.