मुंबई : मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकर प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी. ती म्हणजे पुढील महिन्या पासून मध्य रेल्वे वर ४० फेऱ्या वाढणार आहेत. विशेष म्हणजे या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणार नसून दिवसेंदिवस गर्दी वाढत असलेल्या दादर, कुर्ला, वडाळा या सारख्या स्थानकातून सुटणार आहेत.
मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक देवेन्द्र शर्मा यांनी ही माहिती झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात दिली. नेहमीच गर्दी असलेल्या स्थानकातूनच् या गाड्या सुटणार असल्यामुळे गर्दीमुळे त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.