गोरेगावमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात मात्र, २ जण बेपत्ता

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या  आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Updated: May 28, 2018, 12:10 PM IST
गोरेगावमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात मात्र, २ जण बेपत्ता title=

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या  आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर येत आहे. तर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला आहे.

गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आणि काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागली त्यावेळी इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता २ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरु आहे.